अनीसं सिकांदर शेख ,
पिढ्या दर पिढ्यांनी जपावी मराठी
अशी अंतराळी भिडावी मराठी
तिचे गीत भारुड गझल लावणी ही
जगी उंच स्थानी रहावी मराठी
कला वैभवाचा सुगंधी खजाना
मनी दरवळावी फुलावी मराठी
तिच्या थोरवीचा अलंकार बाणा
सदा अंतरंगी मुरावी मराठी
अभीजात आहेच भाषा मराठी
लिहावी रुजावी उरावी मराठी
तिची गोड वाणी जगाला कळावी
सदा काळजावर वसावी मराठी
मराठी शिकाया विनवते 'अनीसा'
चहू या दिशांना फिरावी मराठी
अनिसा सिकंदर ,दौंड
९२७००५५६६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा