*इक्बाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार).* *सांगली*
*मो:-8983587160*
स्त्रीभ्रूण हत्येचे पडसाद
मुलगी काळी, सावळी, आंतरजातीय, परराज्यातील कशीही असली तरी द्या आणि माझा विवाह करा ही तरुणांची "आर्त हाक" आहे.
मुलगाच हवा हा अट्टाहास असणाऱ्या कुटुंबांनी स्त्री भ्रूण हत्येचे पाप केले आहे. त्यामुळे आजच्या 25 - 30 वर्षाच्या तरुणांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असून त्यांना विवाहासाठी मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.
समजा 25 वर्षांपूर्वी मुली "गर्भात" मारल्या गेल्या असतील तर त्याच काळात "25 वर्षांपूर्वी" जन्म घेतलेल्या मुलाला विवाहासाठी मुली अजिबात मिळणार नाहीत हें "सूर्यप्रकाशाइतके" स्पष्ट आहे.
नोकरीं आहे, पैसा आहे, "बंगला" आहे ,चारचाकी गाडी आहे, विवाहयोग्य वय आहे परंतु तरुणांना लग्नासाठी मुलगीच मिळत नाही हें दुर्दैव आहे.
कोणत्याही जातीची. मुलगी असली तरी चालेल पण माझे लग्न करा असा तगादा. कित्येक युवकांनी "पालकांकडे" केल्याने पालकांची "तारांबळ" उडाली आहे.
सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात 135 तरुणांमध्ये केवळ 5 उपवर तरुणी असल्याची धक्कादायक बातमी आहे. आणि त्या 5 उपवर तरुणींचे विवाह बाहेरच्या जिल्ह्यात ठरले आहेत. आता त्या 135 तरुणांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ??
युनिसेफ रिपोर्टनुसार 5 कोटी मुली गायब !
भारतात तब्बल 5 कोटी मुली गायब असल्याचे युनिसेफ रिपोर्टने सांगितले असून 100 पुरुषामागे 105 महिला असतात परंतु भारतात 100 पुरुषामागे 93 इतके प्रमाण भारतात स्त्रीभ्रूण हत्यां "जास्त" झाल्याचे स्पष्ट करते.
जगात 14 कोटी 26 लाख मुलींना गर्भातच मारले गेले असून त्यामध्ये 4 कोटी 6 लाख या भारतातल्या आहेत.
1970 ते 2020 पर्यंत चीन मध्ये 7 कोटी 2 लाख मुलींना गर्भात मारले गेले आहे.
2013 ते 2017 पर्यंत भारतात 4 लाख 60 हजार गर्भात आणि दररोज 1260 आणि एका तासात 52 मुलींची हत्या झाली आहे असा रिपोर्ट आहे.
1400 वर्षांपूर्वीची मुलींना जमिनीत पुरण्याची प्रथा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी केली बंद* !
पूर्वीच्या काळी मुलगी जन्माला आल्यावर तिला मारले जायचे. मुलीला दुधात बुडवून ,अफिम चाटवून,गळा दाबून,विष देऊन मारले जायचे. काही देशात मातीच्या "गाडग्यात" मुलीला ठेवून वरून त्याचे तोंड बंद केले जायचे त्यानंतर त्या मुलीच्या तोंडातला "गूळ" ठेवून हातात कापडाचा तुकडा ठेवल्याची देखील क्रूर परंपरा होती.
परंतु या जगात प्रेषित मोहम्मद पैगंबर- यांनी जन्म घेतला आणि त्यांनी काही कालावधीनंतर मुलींना "जमिनीत पुरण्याची" तेंव्हाची प्रथा कायमचीच बंद केली. त्यांनी मुलींना - महिलांना नेहमीच संरक्षण दिले त्यांचा सन्मान वाढविला.
आज देखील स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्याचे रॅकेट अस्तित्वात आहे. फक्त "पोलिसांनी" ते शोधून काढायला हवे. हा लेख लिहीत असतानाच, आजच कोल्हापुरात एका बोगस डॉक्टरला पोलिसांनी "स्त्री भ्रूण" हत्येपोटी - औषध गोळ्या दिल्या प्रकरणी "अटक" केली आहे. स्त्री भ्रूण चा विळखा नष्ट करणे आज काळाची गरज बनली आहे.
आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा