Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

गिरवी येथे प्रवीण भैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप काॅलद्वारे शुभेच्छा दिल्या.

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


             - इंदापूर तालुक्यातील गिरवी येथे भाजपा युवा नेते प्रवीण भैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटीलवस्ती गिरवी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

     यावेळी ४० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक महेश क्षिरसागर यांनी मुलांना व्हिडिओकॉल द्वारे प्रवीण भैया माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

     यासाठी शाळेतील शिक्षक साळुंखे सर, सोनार सर, ठोकळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सोनवणे सर, नामदेव क्षीरसागर सर, पंपू भांडलकर, महादेव कोकाटे, सचिन क्षीरसागर, गणेश पवार, समाधान कोकाटे, सागर कोकाटे, सागर गोखले, तुषार कोकाटे आदिसह ग्रामस्थ, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

     महेश क्षिरसागर यांनी प्रवीण भैय्या माने यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. वाढदिवस साजरा करण्याची ही समाजोपयोगी पद्धत इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

फोटो : गिरवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाजपा युवा नेते प्रवीण भैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा