*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- बारामती पंढरपूर एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला प्रवासा दरम्यान आलेला हृदयविकाराचा धक्का चालक वाहकाच्या अथक प्रयत्नानंतरही जिव वाचवू शकला नाही. रूग्णालयाच्या दारात पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी तपासणी अंती सांगितले.
बारामती डेपोची बस क्रमांक एम एच-४० वाय-५८९१ बारामती - पंढरपूर ही बस सकाळी सात वाजता बारामती येथून पंढरपूर कडे निघाली होती. त्यामध्ये इतर प्रवाशासह माळेगाव (बारामती) येथील दत्तात्रय गोपाळ कोळी, वय ७१ वर्षे हे प्रवास करत होते. एसटी बस सकाळी नऊच्या सुमारास बावडा जवळील एस. बी. पाटील शाळेजवळ आली असता जेष्ठ नागरिक दत्तात्रय कोळी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे एसटीच्या महिला वाहक आर्ती गणेश जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी चालक वाल्मिक राजेकुंभार (४६७६२) यांना सांगितले. त्याक्षणी वेळेचे प्रसंगावधान राखत चालकाने एसटी बस बावडा येथील डॉ जय विभूते यांच्या खाजगी रुग्णालयाच्या दारात आणली. त्यावेळी डॉ. विभूते यांनी त्यांची तपासणी करून तातडीने पुढील उपचारासाठी बावडा मल्टिस्पेशालिटी व आय सि यु सेंटर येथे हलविण्यास सांगितले.
बावडा मल्टिस्पेशालिटी व आय सि यु सेंटर येथील डॉ. गौरव ओंबासे, डॉ भुषण चंकेश्वरा व डॉ जय विभूते यांनी रूग्णाची हालचाल थांबली असतानाही सिपीआर व इतर उपचार केले. तसेच शर्तिचे प्रयत्न करूनही रूग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही. रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रूग्णाची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी तपासणी अंती सांगितले. सदरची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एसटी बस प्रवाशांसह रूग्णालयाच्या दारात थांबून होती.
एसटी बस मधील प्रवाशांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करूनही दत्तात्रय कोळी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे समजताच सगळे प्रवासी स्तब्ध झाले. दरम्यान बावडा येथील सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले. रूग्णालयातूनच वाहक आर्ती जाधव यांनी दत्तात्रय कोळी यांच्या कुटुंबीयांना मोबाईल द्वारे सदर घटना कळवली.
फोटो - दत्तात्रय गोपाळ कोळी
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा