*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दारू पिऊन पत्नीस चापट मारल्याच्या पत्नी ने दिलेल्या फिर्यादीवरून आणि तक्रारीवरुन आरोपी रोहित संजय कांबळे वय 28 वर्षे रा. रमामाता काॅलनी, माळीनगर ता. माळशिरस याचेविरुध्द अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. 48/2022 भा.द.वि.सं.क. 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास HC/1829 शिवाजी जाधव यांनी करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले. सदर आरोपीविरुध्द अंडरट्राईल केस चालून मा. ए. व्ही. देशपांडे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट, माळशिरस यांनी आरोपीस 3 दिवस साध्या कारावासाची व 200 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून एम. बी. कदम यांनी तसेच कोर्ट पैरवी म्हणून HC/1764 मुबारक तांबोळी तसेच वाॅरंट अंमलदार HC/1723 संजय खैरे यांनी काम पाहिले.
सदर केसमध्ये नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा