अकलूज --प्रतिनिधी
केदार---- लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व शिवव्याख्याते म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुशांत काटमोरे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.जी.नलावडे होते.
सकाळी महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आनंदी गणेश मंदिरातून शिवज्योत हलगीच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत भव्य रॅली काढत आणली.या रॅलीचे महाविद्यालयात आल्या नंतर शिवज्योतीचे भव्य स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानाला सुरुवात झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर भाषण केले.काही विद्यार्थ्यांनी पोवाडे,गीते सादर करत वातावरण शिवमय केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवव्याख्याते सुशांत काटमोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोत आहेत.त्यांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि शिस्त आजच्या तरुणांनी शिकण्यासारखी आहे. तसेच त्यांनी शिवरायांचे नेतृत्व, युद्धनीती आणि राज्यकारभार या विषयावर विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलावडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा आणि वेळेचे अचूक नियोजन करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील, महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य तसेच प्राचार्य आर.जी.नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.एस.आर.आडत, प्रा.एन.बी.गाढवे तसेच प्रा.आर.व्ही.कणसे,प्रा.एस.एस.भोसले,प्रा.डी.पी.बरकडे, प्रा. डी.एस. मेटकरी ,इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि द्वितीय वर्ष विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा