Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन..


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

तुळजापूर येथील जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले

                 मंगळवार १८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८:०० कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ला अभिषेक करण्यात आला. नंतर सकाळी ११:०० वा मंडळाचे जेष्ठ सभासदांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.व सायंकाळी श्रीराम ढोल पथक यांनी महाराजांचा मूर्तीस मानवंदना देण्यात आली. सायंकाळी ७:०० वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीस सप्त नद्यांचा जलाने अभिषेक व १०८ सुवर्ण होनाचा अभिषेक व १००८ किलो फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळ ७:३० वा नरवीर तानाजी मालुसरे व सरनोबत येसाजी कंक यांचे वंशज रायबा मालुसरे व सिदार्थ कंक व माजी मंत्री श्री मधुकररावजी चव्हाण ( साहेब) यांचा हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. सायंकाळी ८:०० वा प्रसिद्ध शिवशाहीर सुरेशजी जाधव( छत्रपती संभाजी नगर) यांचा अंगवर्ती शहरे आणनारा पोवाडा सादर करण्यात आला.

                       याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव व पोलीस उप अधीक्षक विवेक देशमुख तसेच तुळजापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांची विशेष उपस्थिती होती.

              या कार्यक्रमासाठी मंडळाच्या सर्व सभासदानी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा