*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीरपणे वीट भट्टी सुरू असून सदर वीट भट्टीत चालकास संबंधित प्रशासन पाठीशी घालून अभय देत असून अनेक वेळेस निवेदन देऊन आणि तसेच अर्ध नग्न आंदोलन करून सुद्धा झोपेचं सोंग करत असलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी उद्या मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यालयीन वेळामध्ये सामूहिक आत्मदहन करणार असून संबंधित तहसीलदार तसेच प्रदुषण महामंडळ लातूर हे कारवाही न करता पाठीशी घालत आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून तहसीलदार हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधित वीटभट्टी चालकास अभय देत असून या प्रकाराबाबत उलट आम्हालाच प्रशासनाकडून तुम्ही थांबा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारची धमक्या देण्यात येत असून" *जिसकी लाठी उसकी भैंस* असा प्रकार प्रशासनाचा असून अशा विषयावर जाणून-बुजून कानाडोळा करणे हे अधिकाऱ्यांच्या अंगवळणी पडला आहे त्यामुळे या आंदोलनात अनुसूचित प्रकार घडल्यास संबंधित तहसीलदार व प्रदूषण महामंडळ लातूर हे जबाबदार असणार असल्याचं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष -गणेश पाटील यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनास इशारा दिला आहे.
जिल्हाध्यक्ष गणेश पाटील
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा