Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

*सृजनरंग महोत्सवात पेपर व प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धा संपन्न*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

 *केदार. लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सव २०२५ अंतर्गत आज पेपर सादरीकरण व प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

             या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सण समांरभ ते संस्कृती,किल्ले वाचवा ते अवयवदान,ए आय ते ब्लॅक होल थेअरी,अर्थसंकल्प ते हवामान शास्त्र,अंजठा वेरूळ लेणी ते मानवी जीवनातील नवीन येवू घातलेले बदल,प्राचीन वेळापूर, जल व्यवस्थापन व ॲालंपीकमधील पदकांची कमतरता इत्यादी विषयावर अभ्यासपूर्ण पेपर व प्रोजेक्ट सादर केले. 

        महाविद्यालयातील आर्ट्स, सायन्स व कॅामर्स या शाखेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.पेपर व प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन इंग्रजी विभागाचे प्रा.विष्णू सुर्वे यांच्या हस्ते व सृजनरंग महोत्सव २०२५ चे समन्वयक डॅा. विश्वनाथ आवड यांचे उपस्थितत संपन्न झाले. 



          या दोन्ही स्पर्धेचे परिक्षण प्रा. वसीम सय्यद व प्रा.स्नेहा धांईंजे शिवरत्न मॅनेजमेंट स्टडी कॅालेज शंकरनगर यांनी केले.ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धा प्रमुख डॅा.बाळासाहेब मुळीक, प्रा.प्रसाद लोहार,प्रा.रविराज सोनवणे व प्रा.रविंद्र माने यांनी सहकार्य केले.या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा