अकलूज ----प्रतिनिधी
एहसान. मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलूज
अकलूज येथील नुरी बहुउद्देशीय संस्थेच्या "जामिया बरकाते फातेमा" या मदरसा (वस्तीगृह) मधील 13 विद्यार्थिनीनी आलिमा व फाजीला पदवी प्राप्त केल्याने त्यांची रिदापोशी (पदवी प्रदान सन्मान सोहळा) व खत्मे बुखारिया,चा कार्यक्रम --पिराने पीर हजरत सय्यदना मोहियोदिन अब्दुल कादर जिलानी (बगदाद शरीफ,) रहमतुल्ला अलैह--- -हिंदललवली हजरत सय्यदना ख्वाजा मोईनोदीन चिस्ती( गरीब नवाज) (अजमेर शरीफ) शरीफ--आला हजरत ताजुश्शरीया हजरत मौलाना मुफ्ती अख्तर रजा काजरी अझहरी (बरेली शरीफ) शरीफ---मोहसीने अहेले सुन्नत हजरत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी रहमतुल्ला अलैह (मुसलमान बाडी)--सोफी -ए- हिंद हजरत सय्यदना सोफी अब्दुल्लाह (मोमीनाबाद) यांच्या पावन स्मृतीस स्मरण करून खलिफा- ए -हुजूर ताजुश्शरिया हजरत अल्लामा अल्हाज मुफ्ती मोहम्मद अशरफ रजा कादरी मिसबाही यांच्या उपस्थितीत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत "स्वयंवर हॉल पंचवटी- अकलूज " येथे संपन्न होणार असून अकरानंतर चा कार्यक्रम केवळ महिलांसाठी असणार आहे या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील आलिमा व फाजीला शम्सुन्निसा साहेबा आणि जामिया बरकाते फातिमाच्या, सदर मुअल्लिमा गुलफिशा साहेबा, बरकातीयां यांचे महिलांसाठी मार्गदर्शनपर प्रवचन होणार आहे
या कार्यक्रमासाठी हाफीज व कारी अलहाज हजरत गुलाम रब्बानी रमौल दरभंगा बिहार --हाफीज व कारी नौशाद रजा साहब मुदर्रीस , जामिया बरकाते फातिमा अकलूज, मुअल्लिमा शाहाना बरकातीया साहेबा, मुस्कान बरकातीया साहेबा, रिया फातिमा बरकातीया साहेबा, रुक्सार साहेबा विटा, नुसरत जहा साहेवा,( दरभंगा बिहार) आदि परिश्रम घेत आहेत
याप्रसंगी आलेमा नुरी फातिमा- पुणे, आलिमा शबाना- न्हावरा, आलेमा शाहीन-, पुणे आलेमा कनिज फातिमा-अजमेर शरीफ, आलेमा. नाजमिन-सीतामढी बिहार, आलेमा सानिया -पिंपरी पुणे, आलेमा नाहेदा-अजमेर शरीफ, आलेमा फरदीन- दरभंगा बिहार, आलेमा सामिया---व्यंकटनगर अकलूज,आलेमा सिमरन --न्हावरा ,आलेमा जैनब --दरभंगा बिहार, आलेमा शहनाज --मुंबई, या 13 विद्यार्थिनींना आलेमा व फाजीला पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे तरी अकलूज आणि परिसरातील सर्व मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून पावन व्हावे असे आवाहन नुरी बहुउद्देशीय संस्था संचलित जामिया बरकाते फातेमा चे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद कमरे आलम मिस्बाही तसेच संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळाने केले असून याप्रसंगी उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे
*महत्त्वाचे*
हल्ली महादेवनगर -अकलूज येथे असलेले संस्थेचे मदरसा जामिया बरकाते फातिमा( वस्तीगृहात) विद्यार्थिनींची संख्या वाढत असून त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण होत आहे त्याकरिता "जामिया बरकाते फातिमा"च्या सर्व संचालक मंडळाने एक एकर जागा घेण्याचा निश्चय करून या जागेचा सौदा केला असून त्याकरिता किमान 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे त्यासाठी समाज बांधवांनी यामध्ये सहभागी होऊन आपापल्या परीने हातभार लावावा तसेच 1 गुंठा 2 गुंठे ची रक्कम ही संस्थेस मदत म्हणून देऊ शकता त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तीकडून ही मदत नक्कीच मिळेल अशी आशा वाटते!... त्यामुळे संस्थेचे काम प्रगतीपथावर जाईल यात काही शंका नाही. आणि समाजातील मुली या सुशिक्षित होतील शासनाच्या "बेटी पढाओ बेटी बचाव"या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य चालू असून गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तीने सढळ हाताने मदत करण्याची.
*अल्लाह सर्वांना याबाबत सुबुद्धी दे! हिच अल्लाह च्या बारगाह मध्ये प्रार्थना (दुआ)*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा