*नाशिक प्रतिनिधी --जहीर शेख
रमजानमध्ये जकात दानातून दहा वर्षात जमलेल्या १७.५० कोटी रुपयांतून आतापर्यंत १५२० गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत त्यांना उच्च पदावर पोहचवण्याचे काम नाशिकमधील "आयेशा वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्टने "केले आहे. यातून २५ डॉक्टर, ५५ पॅरामेडिकल क्षेत्रात, ४५ सीए, ६५ कर सल्लागार, ४५ हून अधिक सरकारी अधिकारी, २१० बहुराष्ट्रीय कंपन्यांत मोठ्या पदांवर, १७०
शिक्षक तसेच ३५५ जण इतर क्षेत्रात काम करत आहेत. यातील ३५० विद्यार्थी यशस्वी झाल्यानंतर आता जकात दानातून इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत.
पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आयेशा वेल्फेअर अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत आहे. गतवर्षी जकात दानातून ३० लाख रुपये संस्थेने जमा करत त्यातून ३१५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली. यंदा संस्थेने एक कोटी जकात मिळवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
*अडीच टक्के रक्कम जकातीत*
समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी वर्षांतून एकदा धनिक मुस्लिम एकूण संपत्तीच्या अडीच टक्के रक्कम जकातीच्या रुपाने गरिबांसाठी दान करतो. धर्मात तसे अनिवार्य असून त्यातून अधिक पुण्यप्राप्ती लाभते. मुस्लिम समाजात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प असून, आर्थिक अडीचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतात. त्यामुळे आयेशा या संस्थेने पुढाकार घेत जकात दानाचा पैसा शिक्षणावर खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने समाजात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडत आहे.
*२०१९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम*
२००९ पासून समाजातील गरजू विद्याथ्यर्थ्यांना शिक्षणासाठी 'जकात'ची रक्कम देवून त्यांना संस्थेमार्फत मदत करण्यात येत आहे. यंदा रमजानमध्ये एक कोटी रुपये जकात मिळवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. - अॅड. एम.टी.क्यू. सय्यद, अध्यक्ष, आयेशा वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट
*वडील कापड दुकानात, तर आयशा वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमुळे आज डॉक्टर*
वडील कापड दुकानात कामाला होते. उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. आयेशा ट्रस्टकडून मला आर्थिक मदत मिळाल्याने मला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता आले व आज मी यशस्वी डॉक्टर आहे. --डॉ. एफ. शेख, नाशिक
*आर्थिक मदतीमुळे यशस्वी*
वडील नसल्यामुळे घरची परिस्थिती अतिशय बिकट होती मला आयेशा वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आणि मी चांगले शिक्षण घेऊन कर सल्लागार झालो आज मी पण झकास दान करत आहे
-तौसीफ शेख, सी ए नाशिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा