-टाइम्स 45 न्यूज मराठी**
मो:-- 8378081147*
----- येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये जगतगुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपुर्ती सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न.
सदर सोहळ्यामध्ये नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांनी आपली सेवा समर्पित केली. संत तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु बापूसाहेब देहूकर महाराज, ह भ प आनंद महाराज काकडे, ह भ प ॲड पांडुरंग महाराज लोमटे, ह भ प मच्छिंद्र कावडे महाराज, ह भ प श्रीकांत आरोळे महाराज, ह भ प अंकुश महाराज रणखांबे, तसेच काल्याची कीर्तन सेवा संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री गुरु बाळासाहेब ज्ञानेश्वर देहूकर यांची सेवा झाली.
तसेच प्रवचनामध्ये ह भ प राजाभाऊ आवटी, ह भ प शामराज दंडवते, ह भ प सुग्रीव महाराज मिटकल गुरूजी, ह भ प सुभाष शास्त्री जपे, ह भ प धनंजय दुनाखे सर, ह भ प मारुती महाराज घाडगे यांनी प्रवचनाची सेवा समर्पित केलेली आहे. सप्ताह काळामध्ये गावातील प्रमुखांनी अन्नदान वारकरी सेवा केलेले आहे. यामध्ये लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने संपूर्ण मंदिरामध्ये मंडप व्यवस्था व लाईट डेकोरेशन करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यांतून सोळाव्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह पुर्ण झाला. सप्ताह सोहळ्याचे संयोजक ह भ प अंकुश रणखांबे महाराज व ह भ प आनंद काकडे महाराज यांनी केले होते. सप्ताह कालावधी मध्ये लक्ष्मी नृसिह वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
---------------------------
*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा