*श्रीपूर---बी.टी.शिवशरण*
माळशिरस तालुक्यातील पिलिव येथील महालक्ष्मी यात्रा माळशिरस तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरची गड्डा यात्रा पंढरपूर येथील चार वारी हुलजंती दहीवडी या यात्रा पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी व भव्य अशी यात्रा भरते दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत खिलार जनावरे शेळ्या मेंढ्या यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते शेतीमाल प्रदर्शन गजीढोल कुस्त्या देवीचा रथ मिरवणूक महानैवेद्य असे जत्रेचे स्वरूप असते यात्रेत खेळणी मिठाईची मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आपलीं दुकानं थाटतात रसवंती गृह कोल्ड्रिंक्स दुकान यांची गर्दी असते विशेष म्हणजे सोलापूर सातारा म्हसवड पंढरपूर अकलूज इंदापूर मंगळवेढा जत आटपाडी बार्शी टेंभुर्णी भागातील अनेक व्यावसायिक या पिलिव चे महालक्ष्मी यात्रेत व्यापार धंदा यासाठी येत असतात तसेच एक दोन नामांकित तमाशा लोकनाट्य मंडळ यांची दरवर्षी उपस्थिती असते या सर्वांच्या उपस्थितीमुळे यात्रा महोत्सव कमिटीला उत्पन्न चांगले मिळते एकंदरीत या सर्वांचा लेखाजोखा लक्षात घेतला तर यात्रा कमिटी या यात्रेत येणार्या भाविकांना व्यापारी व्यावसायिक व लहान मोठ्या व्यावसायिक यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरते या वेळी पाणी पुरवठा करणारे पाण्याचे टँकर अत्यंत कमी होते त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागला सगळ्यात कहर म्हणजे संपूर्ण यात्रेत रस्त्यावर धुळीचे साम्राज्य एवढे होते की कोठून कोठे ही यात्रेत फिरत असताना नाका तोंडात धुळ तसेच उघड्यावर मांडण्यात आलेल्या खाद्यपदार्थ रसवंती गृह चहा टपरी दुकानात धुळीचा भयंकर त्रास सहन करावा लागला यात्रेत महालक्ष्मी देवीला महानैवेद्य म्हणून केलेल्या स्वयंपाक व जेवणासाठी बोलावलेल्या मित्र पाहुणेरावळे यांना अक्षरशः जेवायला बसल्यावर धुळीत बसावे लागले समोरून वहाने जात असल्याने जेवणाच्या स्वयंपाक व ताटात धुळ येत होती या वर्षी नव्हे दरवर्षी हीच परिस्थिती व वातावरण असते पिलिव कडून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार ते यात्रेदरम्यान जो रस्ता आहे तो इतका अरुंद आहे कि एकाच वेळी मोटारसायकल ट्रक चार चाकी वहाने तसेच पायी जाणारे यात्रेकरू यांच्या गर्दीमुळे रहदारीची प्रचंड कोंडी झाली होती अत्यंत धिम्या गतीने वहातुक कधी ठप्प तर कधी एकमेकांना आडवी आल्याने बराच काळ वहातुक ठप्प होत होती पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते पण ते ते राहुट्या टाकून हतबल होऊन पहात होते काही पोलिस मोबाईल पहाण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले एकंदरीत दरवर्षी पिलिव येथील महालक्ष्मी यात्रेचे स्वरूप वाढत आहे यात्रेला प्रचंड गर्दी होत आहे तेव्हा यात्रा महोत्सव कमीटी यांनी पुर्व नियोजित यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी व सर्वांना सुविधा पुरवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे धुळीचा सामना करण्यासाठी यात्रेच्या अगोदर दोन दिवस पाण्याचे टँकर द्वारे सर्व यात्रा परिसरात रस्त्यावर पाणी मारुन धुळ कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच जो अपुरा रस्ता आहे त्याला पर्याय रस्ता येणारी वहाने व जाणारी वहाने असा दुहेरी पर्यायी रस्ता करण्याची आवश्यकता नव्हे तर गरज आहे या संदर्भात या विषयावर पिलिव यात्रा महोत्सव कमीटी यांना पत्रव्यवहार करून या समस्या अडचणी सोडविण्यासाठी सुचना व मागणी केली जाणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा