*विशेष-प्रतिनिधी--राजू मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज पोलीस ठाणे जवळ असलेल्या अकलूज शासकीय विश्राम गृहा जवळ काल एक बेवारस मयत नंबर 15 / 2025 मधील पुरुष निदर्शनास आला असून तो अकलूज विश्रामगृहाजवळ बेशुद्ध अवस्थेत मिळाला त्याला 108 ॲम्बुलन्स ने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र तो मृत झाला त्याच्याजवळ ओळख पटण्यासारखी इतर कोणती चीज वस्तू मिळून आली नाही त्यामुळे ओळख पटवता आली नाही त्याच्या अंगात गुलाबी पिवळ्या पट्ट्याचा टी-शर्ट पांढरी रंगाची पॅन्ट असून त्याचे वय 45 वर्ष आहे याचे नातेवाईक अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असल्यास अकलूज पोलीस स्टेशन च्या या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अकलूज पोलिसांकडून करण्यात आले आहे
*मो. :--83083 93900*
*81083 33402*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा