*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- गिरवी (ता.इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कलाविष्कार २०२५ मध्ये गणपतीच्या आर्तीने सुरूवात होवून देशभक्तीपर गिते, शेतकरी गिते, लहान मुलांची नटखट गाणी, संस्कार गिते, गवळण, लावणी आदि विविध स्वरूपांच्या गाण्यांचे व नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यास उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत बक्षिसांची लयलूट करत दाद दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र गिरवी (ता.इंदापूर) यांचा कलाविष्कार २०२५ (वार्षिक स्नेहसंमेलन) उत्साहात संपन्न झाले. त्याचा इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्या शुभहस्ते व उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिनिधी पांडुरंग डिसले, माजी सरपंच राजेंद्र जगताप, सोसायटीचे अध्यक्ष कल्याण क्षिरसागर, माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश क्षिरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी माने, इंदापूर शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बागल, संचालक संतोष तरंगे, केंद्र प्रमुख संतोष साबळे आदिंसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात म्हणाले, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या चांगल्या संयोगामुळेच पटसंख्या वाढली आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत असताना येथे मात्र पालक व शिक्षकांच्या प्रयत्नातून पट दुप्पट वाढला ही प्रशंसनीय बाब आहे. योग्य समन्वय व संयोजनामुळे कलाविष्कार कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण केल्याने उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच माजी विद्यार्थी अमर दादासो जगताप (विक्रीकर निरीक्षक), विजय शहाजी काळे (कॉम्पुटर इंजिनिअर), सुमित नवनाथ डिसले (रोबोटिक्स इजिनिअर), रोहित रामलिंग बेलपत्रे, अर्जुन शामराव क्षीरसागर, दत्तात्रय मोरे (पोलिस), समीर बाबासो जगताप (M. B.B.S डॉक्टर), स्वप्नील नवनाथ क्षिरसागर (Bse Agri), किरण आण्णासो गरेखले (प्राथमिक शिक्षक), अमर बाबासो जगताप (डॉक्टर), श्री साडेकर गुरुजी, सुग्रीव मिटकल गुरुजी, श्री यादव गुरुजी, दत्तात्रय शेंडे गुरुजी, कांचन शेडे मॅडम, श्री. कांबळे गुरुजी, श्री नागणे गुरुजी आदिंचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शोभा काळे मॅडम, नितीन भोसले गुरूजी यांनी केले. प्रास्ताविक गणेश सोलनकर गुरूजी यांनी केले तर आभार संतोष काळे गुरूजी यांनी मानले. कार्यक्रमास उपस्थित पालक, मान्यवर मंडळी व पदाधिकारी यांनी लहान बालकांच्या कलागुणांना बक्षिसांची लयलूट करत मोठी दाद दिली.
कार्यक्रमास प्रशांत घुले, सुहार मोरे, बाळासाहेब महानवर, अशोक कचरे, सोमेश्वर वाघमोडे, मोहन पवार, संतोष घोडके, दिलीप कांबळे, भागवत राऊत, विजय कुलकर्णी, मनोहर जाधव, राहुल निर्मळ, जय कांबळे, प्रमोद मोगरगे, सनी शिंदे, सचिन कोळी, मनिषा निर्मळ, नंदकुमार शिंदे सर व सर्व स्टाफ, अंगणवाडी सेविका सौ संगीता ठोकळे मॅडम, मदतनीस सौ निमला कोरे आदिंनी उपस्थित राहत कार्यक्रमाला शोभा आणली.
फोटो - गिरवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्राचा कलाविष्कार कार्यक्रमात सादरीकरण करताना.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा