Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

*उदयनराजेंनी केली अमित शहाकडे मागणी --छत्रपती शिवराया बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा, अजामीनपात्र गुन्हा ,कायदा पारित करावा*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांचा अपमान होत आहे. औरंगजेबाचे गोडवे आणि शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना, जरब बसवा या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र कायदा पारित करावा, अशी मागणी केली आहे. यासाठी एक निवेदन त्यांनी गृहमंत्री अमित शहांना दिलंय. यामध्ये ऐतिहासिक चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डासह ऐतिहासिक तज्ञांची समिती, असावी अशी मागणी देखील केली आहे.


उदयनराजेंची म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन, समाजामध्ये दुफळी पसरते. अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे, परंतु आम्ही संयम राखुन आहोत. 


केंद्र आणि राज्यशासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही अश्या रोखठोक शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत, केंद्रीय मंत्री ना.अमित शहा यांना समक्ष भेटुन याबाबतचे निवेदन दिले.


देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांची गुरुवारी दिल्ली येथे भेट घेवून, विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी, जेणेकरुन सभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल,अशी सूचना देखिल यावेळी केली.


तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे. आर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहिर केलेले आहे. स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातुन सत्यात उतरवण्यासाठी अखंड परिश्रम घेणाऱ्या आणि युध्दामध्ये गनिमी काव्याचा युध्दमंत्र देणाऱ्या शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित आणि अविकसित राहाणे हे न पटणारे आहे. 23 जानेवारी 1664 रोजी अंतिम श्वास घेतलेल्या शहाजीराजेंच्या असामान्य व्यक्तीमत्वाची समाधी व आजुबाजुचा परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने भरीव निधी उपलब्ध करुन देणे, हे केंद्राचे कर्तव्य आहे.


मराठा साम्राज्याचा किंबहुना छत्रपतींच्या काळात, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक घटना घडल्या. त्याचे साक्षीदार असलेल्या स्वराज्याच्या चार राजधानी व अन्य ऐतिहासिक ठिकाणांचे शिवस्वराज्य सर्किट निर्माण केल्यास, गडकिल्यांचे जतन होवून, भावी पिढीला चिरंतन प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील किल्ले राजगड, किल्ले रायगड, किल्ले अजिंक्यतारा या तीन राजधानी किल्ले व परिसराचा विकास करावा, त्यानंतर दुस-या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानीपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य ठिकाणच्या विकासाचे धोरण आखावे.


मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणेची पायाभरणी झाली आहे. तथापी अनेक वर्षे या स्मारकाला गती मिळालेली नाही. याबाबत शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी बरोबरच असंतोष जाणवत आहे. सदरचे स्मारक महाराष्ट्राची असिमता आहे. जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांगसुंदर असे स्मारक उभारण्याचा आपला मनोदय आहे. हा आपला मनोदय कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे असेही सांगितले. 


दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन आणि चर्चेमध्ये आलेल्या मुदयांविषयी अत्यंत गंभीर नोंद घेत, पृष्ठांकन करुन सूचना निर्गमित केल्या. यावेळी समवेत, काका धुमाळ, ॲड. विनित पाटील, कुलदिप क्षिरसागर, करण यादव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा