*श्रीपूर---- बी. टी.शिवशरण
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांवर कोल्हापूर येथे पन्हाळा गडावर दोन एकर जमीन असल्याची माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहे राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पन्हाळा गडावर दोन एकर जमीन निवासासाठी दिली आहे त्या जमिनीच्या सात बारा उतारा वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख आहे अशी माहिती इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावर एका मुलाखतीत दिली आहे राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांना राजगादी वर बसवले गेले तेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे निधनानंतर राजाराम महाराज यांना सांत्वन पत्र पाठवले होते त्यांनी राजा असलेल्या राजाराम महाराज यांना पत्रात म्हटले की तुम्ही राजा झाला आहात तुम्ही प्रजेचे राजा आहात तुमच्या प्रजेखाली मला प्रजा म्हणून रहायला आवडेल तेव्हा मला निवास करण्यासाठी आपल्या राज्यातील थोडीफार जमीन देण्याची व्यवस्था करावी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली होती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षण घेऊन मुंबईला आल्यावर स्वतः छत्रपती शाहू महाराज हे मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी भेटायला गेले होते तेथे त्यांचा त्यांनी सन्मान केला तसेच कोल्हापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावून जंगी सत्कार केला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे महार परिषदेत राजर्षी शाहू महाराज उपस्थित राहिले उपस्थित सर्वांना राजर्षी शाहू महाराज यांनी संबंधित करतांना सांगितले की आज पासून तुमचा नेता व तुमचा राजा डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत दादर येथे राजगृह या नावाने निवासस्थान बांधले हा इतिहास आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांवर दोन एकर जमीन असल्याची माहिती समोर आल्यानं आंबेडकरी अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा