Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ मार्च, २०२५

*अकलूजला अनुसूचित जाती जमाती आयोगाचे राज्य सचिव दर्जा" गोरख लोखंडे "यांचा पाहणी दौरा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलुज दि.25/3/2024 रोजी अनुसूचित जाती जमाती आयोग राज्य सचिव दर्जा मा.गोरख लोखंडे पाहणी दौऱ्यावर अकलुज येथे आले असता योध्दा प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे यांनी त्यांचे स्वागत केले व दलितांच्या मागणीचे निवेदन सादर केले.


  निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या

 

१) अनुसूचित जातीतील लोकांची महामंडळे , महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक महामंडळ, आणाभाऊ साठे आर्थिक महामंडळ,खादीग्राम उद्योग, इत्यादी शासनाची प्रकरणे मंजूर होतात परंतु स्थानिक बँका ते प्रकरण नाकारतात सदर विषयी आपण दखल घ्यावी व लोकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा ! 

 २) अकलूज नगर परिषद हद्दीतील अनुसूचित जाती जमातीचे अनेक कुटुंब आहेत ज्यांना जागे अभावी घरकुल नाहीत.अकलूज नगर परिषदेकडून जागा उपलब्ध करून देऊन घरकुले प्रकरण मंजूर करण्यात यावीत यासाठी आपण प्रयत्न करावा ! 



३) अकलूज नगरपरिषदे मध्ये आरोग्य विभागाच्या दलित, पारधी समाजाचे अनेक तरुण युवक कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात साफसफाईचे ग्रामपंचायत पासून काम करतात. त्यांना नगर परीषद मध्ये कायम कामगार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली.

अनुसूचित जातीतील लोकांवर वाढते अन्याय अत्याचार पाहता ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा ! 

४) अनुसूचित जातीतील युवकांच्या अभ्यासासाठी अकलूजमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने ग्रंथालय व एम पी सी यु पी सी विद्यार्थ्यांना परिक्षेत प्रशिक्षण वर्ग चालू करावे. चालू करण्यात यावे ! 

5) महषीँ काँलनी येथील मातंग समाज मंदिरास गोरख लोखंडे यांनी भेट दिली त्या वेळी तातडीने मा.मुख्याधिकारी नगरपरीषद यांना 50 लाख रुपये नवीन समाज मंदिर व हाँल साठी निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.

              अशा मागण्यांकरिता योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे यांनी आज अकलूज नगरपरिषद या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या मा.गोरख लोखंडे साहेब.सदस्य (सचिव दर्जा ) राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई. यांना निवेदन दिले सदर विषयी तातडीने दखल घेण्याचे आश्वासन गोरख लोखंडे साहेब यांनी दिले आहे. सदर निवेदन देते वेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे,माजी जि प सदस्य अशोक दादा गायकवाड, बाबाजी खंडागळे, आकाश अडसूळ अमितदादा वाघमारे, आकाश होनमाने, पपू भाऊ मिसाळ उपस्थित होते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा