*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार श्री अजिंक्य रणदिवे यांनी स्वीकारला. आज दिनांक 24/03/2025 रोजी तुळजापूर नगर परिषदेसाठी शासनाच्या आदेशान्वये श्री. अजिंक्य रणदिवे यांची तुळजापूर नगरपरिषदे येथे मुख्याधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. सदर पदाचा पदभार मुख्याधिकाऱ्यांनी आज रोजी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारणे पुर्वी त्यांनी श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले, तद्नंतर कार्यालयांमध्ये उपस्थित येऊन आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी साळुंखे, जिल्हाध्यक्ष अमर ताकमोघे यांनी मुख्याधिकारी यांचे पुष्पगुच्छ, फेटा, आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन स्वागत केले. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना श्री. अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले की, तुळजापूर हे एक ऐतिहासिक शहर आहे लाखोच्या संख्येमध्ये येणारे भाविक भक्त व नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यात सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावा. नेमून दिलेल्या कामांमध्ये कोणत्याही निष्काळाजीपणा, वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी कार्यालयीन कामकाज निर्धारित कालावधीमध्येच पूर्ण होईल असे नियोजन करावे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. बापूसाहेब रोचकरी, श्रीमती नम्रता शिंदे, श्रीमती सायली पाटील, श्रीमती पुष्पांजली मंगरुळे, श्री. शरद पवार, श्री. विशाल लोंढे श्री. प्रमोद माळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक वैभव पाठक यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा