*विशेष ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजीची जयंती अकलूजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.अकलूज मधील विविध भागांमधून जयंती मिरवणुकीचे रथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन ते रथ मिरवणूकीमध्ये सहभागी होतात अकलूज शहरातील विविध भागांमधून येणाऱ्या मिरवणूक रथांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व खराब रस्त्यांमुळे तसेच मिरवणूक रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे अकलूजच्या विविध भागांमधून येणाऱ्या मिरवणुकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले
यावेळी अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जयंती तारखेच्या अगोदरच हे सर्व अडथळे दूर करून जयंतीला कोणताही अडथळा येऊ देणार नसल्याचे सांगितले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई धाईंजे तालुका युवक संघटक विकी लोंढे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अशोक कोळी आकाश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा