Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ मार्च, २०२५

गणेशवाडी येथे दारूबंदीसाठी पोलीस, महिला व नागरिकांच्या समितीची स्थापना

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147*


----- गणेशवाडी गावात यापुढे दारू जवळ बाळगणे व विक्री करताना निदर्शनास आल्यास कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यास आम्ही बांधील असल्याचे बावडा दुरक्षेत्रचे पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत यांनी दारूबंदी बैठकी प्रसंगी सांगितले.

      गणेशवाडी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दारूबंदी संदर्भात महिला व नागरिकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ सुरेश बलभिम घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली बावडा दुरक्षेत्रचे पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलीस आरिफ सय्यद, पोलीस पाटील किरण खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरा भिमा कारखान्याचे माजी संचालक हरिदास घोगरे, शंकर शिंदे, केशव घोगरे, दत्तात्रय शिंदे, सुधाकर कांबळे, राधाबाई घोगरे, सुंदराबाई तावरे, शालन तावरे, विठाबाई घोगरे, बायडाबाई मगर, रतन खंडागळे, अलका खंडागळे, अश्विनी साठे, नंदाबाई आवाड, अनिता गायकवाड आदि मान्यवर महिला व नागरीक उपस्थित होते.

    कळसाईत पुढे म्हणाले, ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार संबंधित दारू विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आले आहेत. त्यानंतरही जरी दारू विक्री व जवळ बाळगणे चालू राहील्यास कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यात येईल. नागरिकांनी दारू विक्री करणाऱ्यांचा फोटो काढून आम्हाला पाठवावा त्याला सोडले जाणार नाही. आमच्या कडून त्यांना कोणतेही मदत केली जाणार नसून दारूबंदी कायमची शंभर टक्के करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या सह्यांचा अर्ज, ग्रामपंचायत ठरावाची प्रत दौंड येथील उत्पादन शुल्क विभागालाही द्यावा त्यांच्या कडून होणाऱ्या कारवाईस आम्ही मदत करू. मात्र चुकीच्या माहित्या दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.




    गावातील दारू चार दिवस बंद न करता कायमस्वरूपी बंद करायची असेल तरच करा नाही तर शोबाजी करण्याची गरज नसल्याचे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. तर दारू बंदी करताना दारू बरोबर दारू विकणाराही जप्त करावा असे अश्विनी साठे यांनी सांगितले. तर दारू विकताना पकडून दिल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी असे सुरेश घोगरे यांनी सांगितले. तर गावातील अनेकांचे संसार दारू मुळे उध्वस्त होऊ लागले असल्याने याचा कायम स्वरुपी बंदची कारवाई करावी असे हरिदास घोगरे यांनी सांगितले. गावात दारूची विक्री होऊ नये यासाठी समिती स्थापन करण्यात यावी असे सागर खंडागळे यांनी सांगितले.

    यावेळी गणेशवाडी दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष सुरेश बलभिम घोगरे, उपाध्यक्ष सागर बाळासो खंडागळे, सदस्य हरिदास घोगरे, दत्तात्रय शिंदे, सुजित घोगरे, आण्णासो घोगरे, हरिदास शाहुराव घोगरे, ज्ञानेश्वर साठे, राधीका घोगरे, स्वाती घोगरे, अलका खंडागळे, अश्विनी साठे, सरस्वती साठे, लतीका कांबळे, पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलीस आरीफ सय्यद, पोलीस पाटील किरण खंडागळे यांची समितीत निवड करण्यात आली आहे.

फोटो - गणेशवाडी येथे गावात दारूबंदी करीता विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा