Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ मार्च, २०२५

*अकलूज येथे धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांची६६ वी पुण्यतिथी साजरी*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुक्याच्या विकास कामासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांना खंबीर साथ देणारे धर्मवीर कै.सदाशिवराव आनंदराव माने पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



            अकलूज येथील सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने पाटील यांच्या अर्ध पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले.यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फत्तेसिंह माने पाटील, किशोरसिंह माने पाटील, सौ.देवन्या शिवतेजसिंह मोहिते- पाटील क्रांतीसिह माने पाटील, शशिकांत माने पाटील,जयराज माने पाटील,हंसराज माने पाटील,सुजयसिंह माने पाटील,बळीराम लोखंडे यांनी पुष्पहार घातले.यावेळी अकलूज परिसरातील नागरिक व कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा