Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ मार्च, २०२५

*अकलूज येथे राम नवमी निमित्त मोफत गर्भ संस्कार शिबिराचे आयोजन*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज आणि रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्यावतीने रामनवमी निमित्त रविवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत स्मृतीभवन शंकरनगर येथे गर्भवती महिलांसाठी मोफत गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भ संस्कार शिबिर आयोजित केले असल्याची माहिती मनशक्ती केंद्र अकलूजचे केंद्रप्रमुख हनुमंतराव (आप्पा) खडके यांनी दिली.                                               

            या शिबिरात कोणत्याही महिन्यातील गर्भवती माता पित्यांना सहभाग घेता येईल.या शिबिरात संस्कार म्हणजे काय व ते कसे करावेत,गर्भासाठी स्वागत,प्रार्थना,संगीत,गोष्ट,

गर्भाला कळते याचे पुरावे, स्ट्रोबोस्कोप चाचणी आणि उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. 

            सुदृढ सतेज सुसंस्कारी पिढीसाठी हा विनामूल्य उपक्रम असून यामध्ये गर्भसंस्कारा संबंधीत मोफत पुस्तके ही देण्यात येणार आहेत.याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणीसाठी ॲड.प्रवीण कारंडे ९९२२२३९९०६,हनुमंत (आप्पा) खडके, ९९६०००२७३४,प्रिया नागणे ९८६०८९१६१६, गजानन जवंजाळ ९४२३३२७९०३ यावर क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा