*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
नीरा नरसिंहपूर,ता.१४ - पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगिरबाबा) यांच्या सभामंडपाच्या सभोवताली पेव्हर ब्लॉक टाकून सुशोभीकरण करण्याची मागणी भाविक व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच यात्रा काळात बसण्यासाठी बाकडे, पिण्याचे व हातपाय धुण्यासाठीचे पाण्याची सोय व रंगरंगोटी करण्याची मागणी भाविक व नागरिकांतून करण्यात आली आहे.
पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगिरबाबा) यांचा उरूस काही दिवसांवर आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्था कडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गावात स्वच्छता, साफसफाई, छबिना मार्गावर काटेरी बाभळी काढणे, गावातील खांबावर बल्ब बसवणे, यात्रेसाठी येणाऱ्या व्यावसायिकांच्या बसण्याची सोय करणे, भाविकांना उन्हाळ्याच्या पाश्र्वभुमीवर पिण्याचे पाणी, सावलींची सोय करण्यात यावी अशी मागणी होत आहे
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाखांच्या निधीतून पिरसाहेबांचा सभामंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भाविकांची यात्रा काळात चांगली सोय झाल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे दर्गाह परीसरात पेव्हर ब्लॉक, पिण्याचे व हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय, दर्गाहला रंगरंगोटी करण्याची मागणी ग्रामस्थ, भाविकांनी केली आहे.
लोकनेते महादेवराव बोडके दादा यांनी गावच्या विकास कामासाठी पक्षाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी आणून विकास कामे केली आहेत. तीच विकास कामांची परंपरा त्यांचे पुतणे माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी पुढे सातत्याने चालू ठेवलेली आहे. तसेच आगामी काळातही विकास कामांसाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून पेव्हर ब्लॉकची मागणी होत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा