*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर )/ दिनांक :४ : "पन्हाळा आणि तळकोकणचे तब्बल पंचवीस वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार ( कै. ) यशवंत एकनाथ पाटील यांच्यासारखे नेतृत्व काळाच्या ओघात अपवादानेच निर्माण होते ," असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी केले. कै. यशवंत एकनाथ पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील यशवंत शिक्षणशास्त्र बी. एड. महाविद्यालयात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. एस. जी. जाधव , कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील - आपटीकर , विद्यार्थी - शिक्षक इम्रान जमादार , सरिता कुंभार यांची भाषणे झाली.
अनिरुद्ध गौतम कांबळे यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. प्रज्ञा मराठे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा