*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श्री क्षेत्र तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त ICU व्यवस्था खास बाब म्हणुन मंजुरी मिळावी अशी मागणी उपजिल्हाप्रमुख धाराशिव श्याम पवार यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन तुळजापूर नगरीत महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशातील काना कोपऱ्यातुन लाखो भाविक देवी दर्शनासाठी येतात. दिनांक 02/02/2025 रोजी तुळजापूर शहरात सोलापूर घाटामध्ये एक लक्झरी बस पलटी झाली होती. त्यावेळी त्यामध्ये 40 ते 50 भाविक होते. त्यावेळी तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अती दक्षता विभागाची सोय नसल्याने तसेच ICU ची व्यवस्था नसल्याने भाविक भक्तांना सोलापूर किंवा धाराशिव येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरीता पाठविण्यात आले. तुळजापूर धाराशिव हे 22 कि.मी. अंतर असुन तुळजापूर- सोलापूर 44 कि. मी. एवढे अंतर असुन अती तात्काळ घटनेच्या वेळी भाविकांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविकांचा विचार करता तुळजापूर येथील उप जिल्हा रुग्णालयामध्ये ICU व्यवस्था खास बाब म्हणुन मंजुरी मिळणे अवश्यक आहे.
तरी मा. मंत्री महोदय यांना विनंती की, श्री क्षेत्र तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त ICU व्यवस्था खास बाब म्हणुन मंजुरी देण्यात यावी अशी नम्र विनंती.
निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा