Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ मार्च, २०२५

*अकलूज येथे महिला दिनानिमित्त महिलांच्या कॅन्सर रोग विषयावर परिसंवाद संपन्न*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना आणी महिला होमिओपॅथिक संघटना यांच्या वतीने जागतिक महिलादिन मोठ्या साजरा करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कर्करोग या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता.या संवादामध्ये डॉ रेवती राणे यांनी मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोहर इनामदार उपस्थित होते. तसेच तालुका मेडिकल अधिकारी डॉ.प्रियांका महाडिक मॅडम,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय सिद,निमाचे अध्यक्ष डॉ.अमोल माने,महिला अध्यक्ष डॉ.विद्या एकतपुरे,डॉ.आनंद देशमुख,डॉ. तानाजीराव कदम,डॉ.अंजली कदम,डॉ.सुनेत्र दोशी,डॉ.सपना गांधी,डॉ.नितीन राणे,डॉ.चैतन्य टेके,डॉ.विनोद शेटे व अकलूज आणी माळशिरस तालुक्यातील सर्व गावामधील इंडियन मेडिकल असोसिएशन,निमा आणी होमिओपॅथी संघटनेच्या महिला आणी पुरुष डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.




                या कार्यक्रमात महिलादिनाचे औचित्य साधून होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राजेभोसले यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये मावशी (साफ सफाई) गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या जवळजवळ १७ महिला कर्मचाऱ्यांचा स्टीलचा ३ थाळी जेवणाचा डबा आणी शाल देऊन सन्मान करण्यात आला.

             हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी डॉ.संजय वालेकर, डॉ.आरती पोफळे,डॉ.शुभांगी माने देशमुख,डॉ.स्नेहा फडे डॉ.दिपाली सर्जे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आरती व डॉ.सुधीर पोफळे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ. वैष्णवी शेटे यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा