Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ मार्च, २०२५

*धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणाचा केंद्रीय नार्को टेस्ट ब्युरो कडून तपास करावा!--खासदार, ओमराजे निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री "अमित शहा "यांच्याकडे मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात "एम.डी. ड्रग्ज"ची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या आमली पदार्थांच्या सेवनामुळे विशेषतः तरुण वर्गाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून, त्यांची पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा पोलीस प्रशासन यांनी या प्रकरणाचा तपास सुरूवातीला हेड कॉन्स्टेबल, नंतर पीआय व त्यानंतर api कडे दिला असून सदरील प्रकरण गंभीर आहे त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे

  

  खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या समस्येवर तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी करत, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे खालील उपाययोजना सुचविल्या आहेत:

 

  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णतः नष्ट करण्यासाठी CNB मार्फत सखोल चौकशी करून गुन्हेगारांचे सर्व पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

    सोलापूर, मुंबई आणि स्थानिक ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून "एम.डी. ड्रग्ज"च्या वाहतूक आणि खरेदी-विक्रीमध्ये समाविष्ट असलेल्या गुन्हेगारांवर नार्कोटिक्स विभागांतर्गत कठोर कारवाई करावी.

  खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित राहील


                                                                                      श्री. संतोष खोचरे,

                   स्वीय सहाय्यक

              खासदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा