Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ मार्च, २०२५

पालखी सोहळा नवीन रस्त्याने न जाता जुन्या मार्गे लवंग गावातून जावा अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी.


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी 

                     पालखी सोहळा नवीन झालेल्या पालखी मार्गावरून न जाता दर वर्षी प्रमाणे लवंग गावातूनच जावा अशी स्थानिक भाविक भक्तांची मागणी पूर्ण व्हावी यासाठी



                      श्री क्षेत्र देहू या ठिकाणी पालखी सोहळ्या संदर्भात झालेल्या  मिटिंग मध्ये लवंग, वाघोली, वाफेगाव, संगम, बाभुळगाव, तांबवे, गणेशगांव या ग्रामपंचायत चे ठराव घेऊन पालखी सोहळा नवीन झालेल्या बायपास मार्गे न जाता जुन्या मार्गाने लवंग गावातून जावा व हा मार्ग रुंदीकरण होऊन पालखी मार्गात घ्यावा यासाठी पालखी सोहळा अध्यक्ष व विश्वस्थ यांना ठराव देण्यात आले. सोहळा अध्यक्ष यांनी ही मागणी मान्य करून पालखी सोहळा गावातून च जाईल असे आश्वासन दिले व यावेळी माजी सरपंच निशांत भैय्या पाटील, सरपंच प्रशांत भैय्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य सीताराम वाघ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा