*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील संपूर्ण महिनाभर केलेल्या उपवासाला रोजा म्हणतात रोजा केल्याने शरीराची सर्विसिंग होते म्हणजेच आपण वर्षभर वेळेअवेळी अन्नग्रहण करतो ते केव्हा पचन होते तर केव्हा नाही त्यामुळे धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या एक महिनाभर उपवास रोजा केल्याने पोटाला विश्रांती मिळते आणि माणूस निरोगी राहतो तसेच रोजा म्हणजे उपाशी राहणे अथवा हा अन्न वर्ज्य करणे नाही तर याबरोबर तोंडाचा रोजा ,डोळ्याचा रोजा, कानाचा रोजा, असणे म्हणजेच रोजा होय कारण रोजा केल्यानंतर तोंडाने वाईट बोलू नये, डोळ्याने वाईट पाहू नये, आणि कानाने वाईट ऐकू नये याचे आचरण केले तरच खऱ्या अर्थाने अल्लाह चरणी रोजा कबूल होतो असे प्रतिपादन अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे जामा मस्जिद बागवान गल्ली येथे महाराष्ट्र राज्य बागवान वर्किंग कमिटी सोलापूर जिल्हा व भैय्या माढेकर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टी प्रसंगी बोलताना व्यक्त केले
या इफ्तार पार्टीत शिवबाबा यांच्या हस्ते रोजदारांना फळे आणि आईस्क्रीम वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मौलाना हाजी अब्दुल गणी साहब, महाराष्ट्र राज्य बागवान वर्किंग कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्या (शकूर) माढेकर, माळशिरस तालुका अध्यक्ष मुख्तार बागवान ,उपाध्यक्ष फरीद बागवान मोहोळकर , शहाजहान चौधरी, हाजी जमीर चौधरी, अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य- अन्वर बागवान, इम्रान बागवान, रियाज बागवान, आरिफ तांबोळी, आणि बागवान बिरादरी चे सदस्य उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा