मो:-- 9730 867 448
केळी पिकाचे तीव्र उन्हापासून संरक्षण काळाची गरज ! केळी पिक जरी उष्णकटिबंधीय असले तरी जर हवेतील आर्द्रता कमी झाली तर त्यावर वाढीवर उत्पन्नावर दर्जावर विपरीत परिणाम होतात .विद्यापीठ शिफारशीनुसार शक्यतो जून -जुलै,ऑक्टोंबर - नोव्हेंबर व माहे फेब्रुवारी पर्यंत लागवड करण्याची शिफारस आहे .केळी पिकाची वाढलेली मागणी, वाढलेले भाव, निर्यातन साठी प्राथमिक सुविधा, डेव्हलप झालेले केळी क्लस्टर व तज्ञ मनुष्यबळ यामुळे केळी पिकाची लागवड अलीकडे वर्षभर केली जात आहे. परंतु एप्रिल मे जून या महिन्यात अति उष्णता तीव्र सूर्यप्रकाश उष्ण वारे व पाण्याची काही प्रमाणातील कमतरता यामुळे या पिकाच्या वाढीवर उत्पन्नावर दर्जावर विपरीत परिणाम होतो तो टाळण्यासाठी कमी खर्चिक शाश्वत उपायोजना करणे काळाची गरज आहे. त्याविषयी आपण माहिती करू न घेऊ या ! १ -उन्हाळी हंगामात केळी बागेला शक्यतो रात्रीचे पाणी देण्याचा प्रयत्न करा यामुळे जमिनीचे तापमान दोन ते तीन डिग्री ने कमी होण्यास मदत होते . २ -केळी रोपाची वाढती मागणी यामुळे व्यापाऱ्यांकडून हार्डनिंग न झालेले रोपे पुरवठा होण्याची शक्यता असते यासाठी शक्यतो मान्यता प्राप्त नोंदणी कृत उतीसंवर्धन कंपनीची व्यवस्थित हार्डनिंग झालेली एक सारख्या वयाची निरोगी रोपे निवड करावी .
३ -फेब्रुवारी नंतर लागवड करायच्या केळी क्षेत्रामध्ये केळी लागवड करण्यापूर्वी प्रत्येक रोपाच्या उत्तरेला व पूर्वेला किमान १०-१२ दिवस अगोदर तागाच्या बियाण्याच्या टोचून लागवड करावीव . तागाच्या रोपाची उंची एक ते दोन फूट झाल्यानंतर त्यामध्ये केळी रोपाची लागवड करावी . यामुळे उत्तरायण मधील तीव्र सूर्य प्रकाशापासून उष्णतेपासून रोपाचे संरक्षण होऊन भविष्यात या तागापासून हिरवळीचे खत उपलब्ध होते . ४ -माहे फेब्रुवारी नंतर जर केळीची लागवड करायची असेल तर केळी रोग लागवड करायच्या मध्यापासून चार दिशेला दोन फुटा अंतरावर दोन फुटाची बांबूच्या काट्या रोवून त्या भोवती गुंडाळून प्रोटेक्शन पेपरचे कव्हर करावे यामुळे तीव्र सूर्यप्रकाश उष्ण वारे यापासून नवीन रोपाचे संरक्षण होते . ५ -उन्हाळ्यात केळीची लागवड करा वयाची असेल तर शक्यतो केळीच्या बेडवरती पांढऱ्या रंगाचा 20 ते 40 मायक्रॉनचा पांढरा मल्चिंग पेपर च्या अच्छादन करावे यामुळे बाष्पसंवर्धन अतिउष्णतेमुळे बाष्पीभवनामुळे होणारे बुरशीजन्य रोगला अटकाव होतो . ६ -केळी रोपांची लागवड शक्यतो पूर्व - पश्चिम करावी यामुळे हवा खेळती राहून काही प्रमाणात तपमान कमी होण्यास मदत होते व उत्तरायण मधील तीव्र सूर्यप्रकाशामुळे काही प्रमाणात संरक्षण व बचाव होतो . ७ -केळी लागवड केलेल्या प्लॉट च्या सभोवती 50% शेडनेटचे चार फुट उंचीचे कुंपण करावे जेणेकरून उष्ण वाऱ्यापासून पिकाची आणि बागेचे संरक्षण होण्यास मदत होऊन तुडतुडे या किडीपासूनही संरक्षण . ७ - -सूर्यप्रकाशापासून केळीच्या घडाचे संरक्षण करण्यासाठी व कीटकांच्या डंकापासून केळी घडाचे संरक्षण करण्यासाठी 17 जीएसएम 31 इंच व दोनशे सेंटीमीटर लांबीची स्कर्टिंग बॅगचा वापर करावा . ८ -उन्हाळी हंगामामध्ये तीव्र सूर्यप्रकाश उष्ण वारे पाण्याची कमतरता वादळी वारे यामुळे केळीचे बुंदे पिचकण्याची खूप शक्यता असते हे टाळण्यासाठी ओळीमध्ये एका केळीच्या बुंध्याला वरच्या 50% उंचीवर प्लास्टिक चितळी सैल बांधून दुसरे टोक दुसऱ्या केळीच्या बुंदेला जमिनीलगत बांधल्याने एकमेकास आधार दिला जातो व केळी पिचकण्याचे प्रमाण कमी होते . ९ - मे ते जून महिने या जुन्या कालावधी व ती उष्णतेमुळे कमी दाबाचे पट्टे तयार होऊन वादळी वारे उष्ण वारे येण्याची शक्यता असते या वाऱ्यामुळे केळीची पाने फाटली जातात त्यामुळे बाप्पीभवन वाढते याचा परिणाम म्हणजे केळीचे वाढ उत्पादन दर्जा प्रत यावर उपयोगी परिणाम होतो हे टाळण्यासाठी बागेच्या भोवती शक्यतो पश्चिमेला सुबामुळ, शेवरी ,गीनी ग्रास किंवा तुतीचा या पिकांचा वारा प्रतिबंधक ओळीची लागवड करावी .तरी या उपयोजना करून माहे फेब्रु - एप्रिल नंतर लागवड केलेल्या केळी बागेचे पिकाचे संरक्षण करण्याचे आव्हान मंडळ कृषी अधिकारी अकलूज आयएसओ 9001 :2015सेवारत्न श्री सतीश कचरे व कार्यालय केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा