Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० मार्च, २०२५

*सध्याच्या धावपळीच्या युगात सुसंवाद ही एक काळाची गरज बनली आहे*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

सध्याच्या मोबाईलच्या युगात माणूस रमुन गेला आहे तसेच एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी युगात संपर्काची व करमणुकीची विविध साधने निर्माण झाली आहेत.त्यामुळे प्रत्येक जण आपल्याच विश्वात व्यस्त झाला आहे.अशावेळी एकमेकांच्या भावना जाणून घेणे व शब्दात व्यक्त होणे हे तर सोडाच साधा संवाद साधण्यासाठी सुद्धा कुणाकडे वेळ नाही.

       प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असतेच जिचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडलेला असतो मग ती घरातली असो कुटुंबातील असो किंवा समाजातील असो आपण पुर्ण आयुष्य हे कुणाचं तरी किंवा वेगवेगळ्या व्यक्तींचं अनुकरण करत असतो.ज्यामुळे आपल्या आयुष्यात काही चांगले परिणाम व बदल घडत असतात पण आपण अशा उपकारक व्यक्तीबद्दल कधीही आदर व्यक्त करत नाही.आभार व्यक्त करत नाही किंवा धन्यवाद ही देत नाही हा कृतघ्नपणा नाही का ? 

           आचार्य अत्रे यांनी एका ठिकाणी म्हटला आहे की,मला नालायक,मूर्ख म्हणालात तरी हरकत नाही पण कृतघ्न कधीच म्हणू नका.हा कृतज्ञतेचा विचार मनात घेऊन आज महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेड अकलूजमधील सर्व मैत्रिणींनी एक आगळावेगळा उपक्रम साजरा करायचे ठरविले ज्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात एक चांगला ठसा उमटला आहे.चांगले बदल झाले आहेत.त्या महिला व्यक्तीस लेखी पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करायचे ठरवले त्यास अनुसरून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड अकलूज तालुका माळशिरस (सोलापूर पंढरपूर विभाग) यांच्या वतीने महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महिला दिनानिमित्त आज आपल्या आयुष्यातील जे कोणी महिला प्रेरणास्थान असतील, ज्यांच्यामुळे आपले आयुष्य पूर्णपणे बदलले आहे अशा बऱ्याच महिला प्रेरणा देतात परंतु त्यांना आपण कधीच धन्यवाद देत नाही तर आज असा उपक्रम घेण्यात आला ज्यामध्ये ज्या महिलांकडून आपल्याला प्रेरणा मिळून आपले पूर्णपणे जीवन बदलून गेले आहे. अशा महिलेला आपण पत्राद्वारे धन्यवाद दिले आहेत.आज महिला दिनानिमित्त जुन्या विचारांना उजळणी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आणि सर्व महिलांना आपल्या आपल्या आयुष्यामधील महिला प्रेरणास्थान असलेल्या महिलेला पत्र लिहिण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि लेखी पत्राद्वारे त्यांना धन्यवाद देण्यात आले.या स्पर्धेत शिवमती आशा सावंत माळशिरस तालुका उपाध्यक्ष या विजेत्या झाल्या त्यांना बक्षीसही देण्यात आले.सर्व महिला खूप भावनिक झाल्या व आपल्या गुरुला धन्यवाद दिले अशा प्रकारे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी महिला दिन साजरा केला.

            यावेळी जिल्हा उपाध्यक्ष

शिवमती मनीषा गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष शिवमती शुभांगी क्षीरसागर,जिल्हा प्रवक्ता शिवमती सुवर्णा घोरपडे तसेच तालुकाध्यक्षा शिवमती शारदा चव्हाण,तालुका उपाध्यक्ष शिवमती आशा सावंत,तालुका प्रवक्ता सुनिता नडगिरे,सचिव शिवमती पूनम सुसलादे शिवमती कार्याध्यक्ष कल्पना चव्हाण, कार्याध्यक्ष शिवमती सुवर्णा क्षीरसागर,संघटक शिवमती संगीता जगदाळे संघटक शिवमती रंजना शिरसट उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन शिवमती मनोरमा लावंड, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष (सोलापूर पंढरपूर विभाग) यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा