S B TAMBOLI
इंदापूर तालुका प्रतिनिधी
---राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज खात्याचे मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पिंपरी बुद्रुक येथील उद्योजक हरिदास सूर्यवंशी यांच्या श्री गणेश हॉटेल व स्वीट होमला सदिच्छा भेट दिली.
नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांच्या स्वागतासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार ॲड राहुल कुल स्वागतास उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत गेल्यानंतर मंत्री गोरे परतीवेळी पिंपरी बुद्रुक मार्गे चालले होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे घनिष्ठ मित्र पिंपरी बुद्रुकचे उद्योजक हरिदास सूर्यवंशी यांना भेटण्यासाठी आवर्जून आले होते. त्यांनी यावेळी श्रीगणेश हाॅटेल व स्विट होमला भेट देवून कुटूंबियांची आस्थेवाईक पणाने चौकशी केली. यावेळी समाधान बोडके, सतीश सुर्यवंशी, मल्हारी सुर्यवंशी, हरिदास सूर्यवंशी, विश्वजीत सुर्यवंशी, अंजली सुर्यवंशी, अनिकेत सुर्यवंशी, श्रावणी सुर्यवंशी, दत्तात्रय कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा