यावेळी गावात ठिकठिकाणी महिलांनी कावडीचे पूजन केले. गणेशवाडी येथील बाळासाहेब घोगरे यांच्या मानाच्या कावडीचे पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फणिंद्र कांबळे, नागेश घोगरे, मुजाहिद तांबोळी, भाऊसाहेब कांबळे आदिंसह शंभो महादेव भक्त उपस्थित होते. पिंपरी बुद्रुक येथे कावडींची स्थापना झाल्यानंतर परंपरेप्रमाणे कावडीतील भक्तांना सरबताचे वाटप करण्यात आले. तर माजी सरपंच आबासाहेब बोडके यांच्याकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावडींना गुढीपाडव्यापासून सुरूवात होते. नवमी, दशमीला विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक येथील भाविक दर्शनासाठी शिंगणापूरला येतात. दशमी, एकादशीला इंदूर, वाल्हेर घराण्यातील राजे राजा पुष्कर तलावात अंघोळ करून राजाचा वेश परिधान करून घोड्यावरून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येतात. पूजेच्या पहिल्या मानाप्रमाणे त्यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक होतो. द्वादशीला पुणे जिल्ह्यातील मानाच्या कावडी कन्हा नदीचे पवित्र जल घेऊन मुंगी घाटातून अवघड चढण पार करीत शिंगणापूरमध्ये दाखल होतात. मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. रात्री बारा वाजता कावडी महादेवाला जलाभिषेक करतात. नंतर कावडीच्या परतीचा प्रवास सुरू होतो.
फोटो - गणेशवाडी येथील बाळासाहेब घोगरे यांच्या कावडीचे पुजन करून स्थापना करण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा