*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
माळीनगर हे गाव समतेचे प्रतीक असून इथे सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. रोजा करण्या मागचा उद्देश हा आहे कि ,गर्भ श्रीमंतांना भुकेची जाणीव व्हावी त्यांना गरिबांच्या भुकेबाबत आस्था निर्माण व्हावी आणि गोरगरिबांना अन्नदान करावे या उद्देशाने अल्लाहने मुस्लिमा समाजावर रमजान महिन्याचे 30 रोजी सक्तीचे आणि अनिवार्य केले आहे त्यामुळे रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या अनुषंगाने आज माळीनगर येथील मुस्लिम समाजाच्या "रोजा इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे मी भाग्यवान आहे असे प्रतिपादन दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर चे चेअरमन राजेंद्र( रंजनभाऊ) गिरमे यांनी सासवड माळी शुगर फॅक्टरी च्या वतीने आयोजित मुस्लिम समाजाच्या रोजा इफ्तार पार्टी प्रसंगी बोलताना व्यक्त केले
प्रारंभी रंजनभाऊ गिरमे यांचा सत्कार माळीनगर मुस्लिम जमात चे अध्यक्ष- हाजी जब्बारभाई तांबोळी यांच्या हस्ते तर अकलूज चे मौलाना हाजी मोहम्मद कमरे आलम मिसबाही साहब यांचा सत्कार माळीनगर मुस्लिम जमात चे सचिव-- जाफरभाई सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला
या रोजा इफ्तार पार्टीस भाजपाचे शिरीषभाई फडे , माळीनगर ग्रामपंचायत सदस्य-लक्ष्मणराव डोईफोडे, महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन- महादेवराव एकतपुरे, व्यापारी संघाचे रिंकू राऊत, विलास जाधव ,माजी सरपंच -अभिमान जगताप, सावंत सर माजी उपसरपंच- संग्राम भोसले, मच्छिंद्र हजारे, अनिल सकट उद्योजक प्रताप माने, सावंत गुरुजी , राजू कांबळे घोळवे,देवकर, ओव्हाळ,, डांगे, गणेश बेंद्रे , ऋषितोष बेंद्रे, राजू लोखंडे, गुळवे, संजय ऐवळे ,पत्रकार ---गणेश करडे, गोपाळ लावंड, टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक --हुसेन मुलाणी , आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते
याप्रसंगी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच माळीनगर पत्रकार संघाच्या वतीने ही गोपाळ लावंड, यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिकंदरभाई शेख, इकबालभाई जमादार ,मुबारक शेख ,बाब सय्यद, इमाम शेख ,समीर शेख, बाबा कोरबु आणि मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लायकअली सय्यद यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा