उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गणेशगाव येथे नेहमीप्रमाणे गावातील ज्ञानेश्वर मोरे ,सोमनाथ मोरे बंधू यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त विनाशुल्क शेकडो लिटर दूध वाटप करून मानवतेचा व एकात्मतेचा संदेश दिला.गावातील हिंदू धर्मिय शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे इफ्तारीच्या वेळी वाटप करून पुण्यकर्म करून मानवता जोपासली, व गावातील हिंदू बांधवांनी प्रत्येक मुस्लिम बंधवास गळाभेट घेवून ईद च्या शुभेच्छा देत शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.इदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर मौलाना हसन शेख यांनी समाजबांधवांना आवाहन केले .
इस्लाम हा जगाला शांततेचा संदेश देणारा धर्म आहे अल्लाहने देवदूत प्रेषित पैगंबर यांच्या मार्फत इस्लाम धर्माचे संविधान पवित्र कुराण मानवतेच्या भल्यासाठी मनुष्यासाठी पाठविले आहे अमन ,शांतता ,बंधुभाव एकात्मता याची शिकवण कुराण मधून व प्रेषितांनी स्वआचरणातून दिली आहे.कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे सैतानी कृत्य करू नये.रमजान चे तीस रोजे संयम बाळगने ,दान धर्म करीत पवित्र कार्य करण्यास शिकवतात ,आपण अल्लाहच्या या आदेशाचे पालन सदैव करीत राहिले पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा