Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

*संग्रामनगर येथे राम जन्मोत्सव उत्साहात साजरा*

 




*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

संग्रामनगर येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्ट यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव व श्री साई प्राणप्रतिष्ठाचा २८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.                                                  

         या निमित्ताने श्री साईबाबा मंदिरात पहाटे श्री साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक व महापूजा करण्यात येऊन सकाळी ८ वाजता विश्वशांती यज्ञ विकास भोसले व सौ प्रियांका भोसले यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलीत करण्यात आला.या नंतर शिवशंभो भजनी मंडळ यांचे भजन सेवा होऊन दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सौ.युगंधरादेवी क्रांतीसिंह माने- पाटील यांच्या हस्ते दुपारची महाआरती करण्यात आली. यावेळी संग्रामनगरचे सरपंच पंकज गाडे,उपसरपंच सौ.तेजश्री माने देशमुख,राजमाने,पाटील, जसभाई पटेल आदी मान्यवर उपस्थितीत होते.आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सुमारे अडीच ते तीन हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. सायंकाळची आरती हनुमंत खडके यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी श्रीराम व श्री साईबाबा चे दर्शन घेतले.सायंकाळी ब्रह्मचैतन महिला मंडळ माळीनगर व ओंकार महिला भजनी मंडळ शंकरनगर यांनी आपली भजन सेवा सादर केली.या सर्वांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील व सचिव ॲड.राजेंद्र आर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. 


           हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद तरुण मंडळ,शिवगर्जना ग्रुप लोणार गल्ली,क्रांतिसिंह रिक्षा टॉप व अकलूज बुरुड समाज तसेच ट्रस्टचे सदस्य देवचंद ओसवाल,अरुण राऊत,अशोक गुजर,चंद्रकांत कुंभार,विजय टोंगळे,सुभाष काळे,दीपक शिंदे उमेश शेटे,सर्व सदस्य यांनी विशेष सहकार्य केले.डॉ रावसाहेब गुळवे,उदय टेके, मनोज रेळेकर,सागर नेवसे, प्रदीप भोसले,रोहन वेळापुरे, निखिल फुले,श्री व सौ जुनेजा महेश खडके व लोकमान्य व शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा