*माढा तालुका-- प्रतिनिधी*
*हनुमंत मस्तुद*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशनच्या वतीने आज श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे भाविकांच्या सोयीकरिता थंड व शुद्ध जल - प्याऊ प्रकल्पाचे लोकार्पण आर. एम. डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारिवाल व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शोभाताई धारिवाल व आर. एम. डी फाऊंडेशन हे पर्यावरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. पाझर तलाव बांधण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' सारखी योजना आर. एम. डी फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविली जाते.
देशभरातील नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सध्या आर. एम. डी फाऊंडेशनच्या वतीने भारतभर 'प्याऊ प्रकल्पाची' अंमलबजावणी केली जात आहे. या प्याऊ प्रकल्पाच्या माध्यमातूनच आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे प्रति तास दोन हजार लिटर क्षमतेच्या आर.ओ प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. प्याऊ जल प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
आर. एम. डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांचा देवीजींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र देऊन मंदिर संस्थानच्या वतीने विश्वस्त तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, महंत वाकोजीबुवा, आकाश राठी, चंदुशेठ लढ्ढा, योगेश कवडे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, रामेश्वर वाले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, गणेश मोटे, जयसिंग पाटील, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, नवनाथ खिंडकर, मंदिर संस्थानचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा