Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

*डॉ.घैसास व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर महिलेच्या मृत्यू प्रकरणी ॲट्रॉसिटी कायदा आणि खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल करा ---ॲड-तौसिफ शेख*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तनिशा ऊर्फ इश्वरी सुशांत भिसे या अनुसूचित जातीतील गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे आपत्कालीन वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. तनिशा ही जुळ्या मुलींच्या गर्भवती अवस्थेत गंभीर स्थितीत असताना हॉस्पिटलने केवळ आगाऊ रक्कम भरली नाही म्हणून तिला दाखल करण्यास नकार दिला. एका बाळासाठी १० लाख रुपये, म्हणजे एकूण २० लाख रुपये भरल्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, अशी अट टाकण्यात आली होती. या अमानवीय आणि बेजबाबदार वागणुकीमुळे तनिशाचा मृत्यू झाला आणि दोन नवजात मुलींना आईविना जगावे लागणार आहे.


इतके गंभीर प्रकरण असताना देखील, अलंकार पोलीस स्टेशन, पुणे येथे या प्रकरणी एफआयआर क्रमांक ६५/२०२५ नोंदविण्यात आला असला, तरी तो केवळ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) - निष्काळजीपणामुळे मृत्यू - अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.




अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सदरील प्रकरण हे केवळ निष्काळजीपणाचे नसून, एक सामाजिक भेदभाव आणि गुन्हेगारी हेतूने झालेली दुर्लक्षाची घटना आहे. मुख्य आरोपी डॉ. सुश्रुत घैसास हे उच्चवर्णीय असून, पीडिता ही अनुसूचित जातीतील असल्यामुळे हे प्रकरण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत सखोल चौकशीस पात्र आहे.


अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी एफआयआरमध्ये पुढील कलमे त्वरित समाविष्ट करण्याची मागणी केली आहे: कलम १०५ – ठार मारण्याचा दोष except murder (culpable homicide not amounting to murder) कलम १०९ सह कलम ६२ – खुनाचा प्रयत्न कलम ९१ – बाळ जिवंत जन्माला येऊ नये याचा हेतू कलमे १२५, ४९, ६१ – जीवितास धोका, सहभाग व कटकारस्थान त्याचबरोबर, डॉ. घैसास यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, तसेच संबंधित हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय कर्मचारी व प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


त्यांनी पुढे म्हटले की, “वैद्यकीय क्षेत्र हे सेवा भावी क्षेत्र असताना, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने फक्त रुग्णांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत, केवळ खंडणी व पैशाची लूटमार केली. पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णाला मृत्यूकडे ढकलणे — हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तनिशा भिसे यांचा मृत्यू ही फक्त एक घटना नाही — ही सामाजिक न्याय, वैद्यकीय नीतिमत्ता, आणि सर्वांना, विशेषतः वंचित व दुर्बल घटकांना, आपत्कालीन आरोग्यसेवा मिळावी याचा गंभीर प्रश्न आहे.” तसेच डॉ. सुश्रुत घैसास यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी स्पष्ट केले आहे की, जर त्वरित कारवाई झाली नाही, तर सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध कोर्टात कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा