Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

लवंग ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

लवंग (ता.माळशिरस) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये बीपी तपासणी, शुगर तपासणी,नेत्र तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३५ पुरुष व ३२ महिला समाविष्ट होत्या.या आरोग्य सेवा शिबीराला एच.व्ही.देसाई नेत्र रूग्णालय मोहम्मदवाडी, पुणे संचलित टेंभुर्णी नेत्र तपासणी केंद्रातील कार्यरत आरोग्य सेवक जावेद तांबोळी,नेत्र चिकित्सक सागर कोळेकर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

          यावेळी लवंग गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच प्रशांत भिलारे, माजी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सिताराम वाघ,सज्जनकुमार दुरापे पाटील, मोहन कांबळे,शंभूराजे पाटील,तानाजी रणसिंग,यशवंत गेजगे तसेच लवंग गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष युवराज वाघ लवंग गावचे पोलीस पाटील विक्रम भोसले,गणेश चव्हाण, पांडुरंग जाधव,दत्तात्रय चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



         या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ६७ रुग्णांपैकी ९ रुग्णांना मोतिबिंदू हा दृष्टिदोष आढळून आला आहे.त्या नऊ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेकरिता महंमदवाडी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा