संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आर्य चौकात प्रभु श्रीराम जन्मोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजराकरण्यात आला
जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच, आर्य चौक, श्री क्षेत्र तुळजापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभु श्रीराम जन्मोत्सव रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता पारंपरिक पद्धतीने व अत्यंत भक्तिभावात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांचे जन्मपूजन, रामरक्षा पठण आणि सामूहिक आरती करण्यात आली. ५१ किलो गोड पेढ्यांचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. संपूर्ण परिसरात रामनामाचा जयघोष होत होता, आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.
मंडळाच्या सभासदांनि मनोगत व्यक्त करताना सांगितले कि श्री राम नवमी हि शहरातील प्रत्येक चौकात, मंडळात प्रत्येक वर्षी उत्साहात साजरी व्हावी त्यासाठी प्रयत्न करीत राहतील.
कार्यक्रमस्थळी मान्यवर म्हणून अमोल कुतवळ, . शाम पवार, सुदर्शन वाघमारे, . राजाभाऊ चोपदार,
. कोरे सर, . नागेश किवडे, . प्रसाद प्रयाग,. शुभम खोले, .पुरंजन कोंडो, . दुर्गेश वराडे, . सोमा मस्के, . ओंकार लसने, सागर मस्के, संकेत मस्के, सचिन बागल, . शुभम दहिहांडे, श्री. अर्जुन परदेशी, श्री.आदित्य बुरांडे, . संकेत मस्के, . समर्थ शिवराज लोंढे आणि ज्येष्ठ पत्रकार . सतीश महामुनी व . प्रदीप अमृतराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी श्रीरामाच्या आदर्श जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले.
जय श्रीराम! जय भवानी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा