Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

*सोलापूर येथील पोलीस दलातील "आसिफ मुजावर " यांचे निधन-- पोलीस दलाल तर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना..*

 

*सोलापूर ---प्रतिनिधी*

*आंबिद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

पोलीस हवालदार आसिफ मुजावर यांचे निधन ; पोलीस दलातर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना

सोलापूर – जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार आसिफ महेबूब मुजावर (वय 41 वर्ष, रा. 14 आदर्श नगर, लक्ष्मीनारायण टॉकीज मागे, एमआयडीसी रोड, सोलापूर ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले.




त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून काढून अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पोलीस दलातील सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

कब्रस्तान मध्ये शहर पोलीस दलातर्फे तीन वेळा हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,चार भाऊ असा परिवार आहे. ते सर्वांशी हसतमुख व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ मुजावर हे मार्च 2003 साली शहर पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस दलातर्फे भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 100 मीटर धावणे ,लांब उडी, ट्रिपल जंप प्रकारात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा