*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
*(पत्रकार)--सांगली*
*मो:-8983 587 160
सांगलीत एका लिंगपिसाट म्हाताऱ्या माणसाने "धुमाकूळ" घातला असून, रस्त्यावर चालत - चालत दुचाकी वरील महिलांना तसेच रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी महिलांना थांबवत अधिकारवाणीने, मोठ्या आवाजात अप्रत्यक्ष दादागिरी करत आर्थिक मदत देण्याच्या बहाण्याणे युवती - महिलांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याऱ्या या लिंगपिसाट म्हाताऱ्यापासून सांगलीकर महिलांनी सावध राहण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
आतापर्यंत मी स्वतः 6 ते 7 वेळा महिलांचे शोषण करताना त्या म्हाताऱ्याला मी स्वतः पाहिले आहे तसेच एका महिलेला आलेला अनुभव स्वतः महिलेने मला सांगितल्याने मला "धक्का" बसला. सांगलीतील समस्त महिलांना सावध व्हाव्यात म्हणून हा समाजप्रबोधनाचा लेख लिहिला आहे.
एका दुचाकी असणाऱ्या महिलेला या म्हाताऱ्याने लिफ्ट मागितली असता, त्या महिलेच्या मागे चिटकून घट्ट बसण्याचा प्रकार याने केला,त्यानंतर त्या महिलेला हॉटेल मध्ये जाण्यासंबंधी विचारले.ती महिला "भेदरून" गेली आणि तात्काळ या म्हाताऱ्याला उतरवून धूम ठोकली. मी त्या महिलेच्या पूढे होतो, मी काय झाले ?? असे विचारताच त्या महिलेने या लिंगपिसाट म्हाताऱ्याचे बिंग फोडले.
आधी "पैसे" घेण्याच्या बहाण्याने महिलांना "गोड" बोलून पाठीवर हात फिरवायचे ,लगट करायचे इथपर्यंत हा विषय असताना या म्हाताऱ्याची हॉटेल मध्ये जाऊ अशी मजल गेली आहे.
भविष्यात कदाचित एखादी भोळसट / गरीब मुलगी याच्या तावडीत सापडली तर काय होईल ??? सांगलीतील राम मंदिर चौक , पंचमुखी मारुती रोड, एस. टी. स्टॅन्ड रोड, स्टेशन चौक विश्रामबाग येथे याचा जास्त "वावर" असतो. आत्तापर्यंत किती महिलांना या म्हाताऱ्याने "फसवले" असेल याची माहिती नाही.
सुजाण महिलावर्गाने - तरुणींनी या म्हाताऱ्या माणसाने हात केला,आवाज दिला आणि थांबवले तर अजिबात थांबू नये, किंवा पैसे अथवा लिफ्ट देऊ नये. त्याशिवाय याने मोठया आवाजात "दादागिरी" केल्यास आजूबाजूच्या लोकांना सांगावे अथवा पोलिसांना फोन करावा. पालकांनी आपल्या मुलींना या लिंगपिसाट म्हाताऱ्याविषयी योग्य ती कल्पना द्यावी.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा