*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
भगवान महावीर यांच्या २६२४ व्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्ताने आस्था रोटी बँकेतर्फे अनाथ मुलांना नवीन कपडे व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंट व नातेवाईकांना मिष्टान्न भोजन तसेच दोन गरजू मुलींना त्यांच्या लग्नकार्यासाठी लागणारे साहित्य वाटप देखील करण्यात आले.
गेल्या अनेक काळापासून चालत आलेली दान परंपरा जी अजूनही श्रेष्ठ मानली जाते त्याच दान परंपरेचा वारसा गेल्या दहा वर्षापासून आस्था रोटी बँक अखंडपणे जपून ठेवत आहे कोणतेही सणवार असो व शुभ प्रसंग असो ते सण केवळ आपल्या पुरता मर्यादित न ठेवता गरजू गोरगरिबाबरोबर साजरा करते.
त्याच सणावारामध्ये एक म्हणजे"महावीर जयंती"ज्यांनी समस्त विश्वाला "जगा आणि जगू द्या"असे अहिंसा आणि दया भावनेचा उपदेश दिला त्यांचे आदर्श समोर ठेवून आज आस्था रोटी बँकेतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या आजारी रुग्ण व त्यांच्यासोबत नातेवाईक यांना आंब्याचा रस, पुरणपोळी मसाला भात चे जेवण देण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शरणार्थी, राजेश लाहोटी, कामिनी गांधी, सुवर्णा कटारे, अंकित झंवर, विजय करवा, रामराव रहाणे, सुलभा राहणे, अक्षरा गांधी, राजू तुगावकर, खराडे सर या सर्वांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती.
सोबतच ६० अनाथ मुला मुलींना नवीन कपडे देखील वाटप करण्यात आले आणि दोन गरजू मुलींना लग्नाचे संपूर्ण साहित्य देखील देण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून
अशा प्रकारे भगवान महावीरांचे जन्म जयंती आस्था रोटी बँकेतर्फे खऱ्या अर्थाने साजरा करण्यात आली.
तसेच आस्था रोटी बँकेचे सदस्य छाया गंगणे, संपदा जोशी, श्रद्धा अध्यापक, स्नेहा मेहता, अनिता तालीकोटी, सुरेखा पाटील, राहुल कुरकुट, अरिहंत छंचुरे व आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे हे सर्वजण उपस्थितीत होते.
तसेच उडान पंख माणुसकीचे या संस्थेने देखील मदत केली आहे
आस्था रोटी बँक नेहमीच अशा गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असते.
सूत्रसंचालन सुवर्ण कटारे केले तर आभार प्रदर्शन छाया गंगणे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा