Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

*पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी- पर जिल्ह्यातून येऊन पंढरपूर शहरामध्ये महिंद्रा बोलेरो जीप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातून केली अटक*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

परजिल्हयातुन येवुन पंढरपुर शहरामध्ये महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्हयातुन पंढरपुर शहर पोलीसांनी केले गजाआड


पंढरपूर शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनकारीता आलेल्या भाविकांची चार चाकी वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क. MH11AK2198 ही चोरीस गेल्याने पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दिनांक ०१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय बातमीदारा मार्फत तसेच काही तांत्रीक पध्दतीने तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे महंमद मुदस्सीर महंमद युनूस वय २८ वर्षे धंदा मजुरी रा उत्तमचंद प्लॉट, तारफेल अकोला जि. आकोला याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन गुन्हयात चोरीस गेलेले वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क. MH11AK2198 हे आरोपीच्या ताब्यात मिळुन आल्याने ती गुन्हयाचे अनुषंगाने जप्त करून सदरची जिप ही पंढरपुर पोलीस ठाणेस अणुन जप्त करण्यात आलेली आहे.


सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजीरंग

बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे, पोका ४०७ विनोद पाटील तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा