Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

*"टाइम्स 45 न्यूज मराठी" ची दखल महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे सफाई कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता सुरू!*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण

श्रीपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील स्वच्छता साफसफाई आज दुपारी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे कर्मचारी यांनी सुरू केली आहे गेली अनेक वर्षे या परिसरातील स्वच्छता न झाल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा कोंबड्यांची पिसे व इतर टाकाऊ साहित्य अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत पहायला मिळाले त्यामुळे सफाई कर्मचारी यांना संपुर्ण परिसर स्वच्छ करण्यास अडचणी आल्या सफाई महिला कर्मचारी खराटयाने रस्ता झाडत होत्या तर पुरुष कर्मचारी फावडे घेऊन सर्व कचरा एकत्र गोळा करून एका ठिकाणी कचरा पेटवून देत होते साफसफाई सुरू केल्याने बरेच वर्षांनी हा परिसर स्वच्छ झाल्याचे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे येथील स्थानिक टपरीधारक यांनी सुचना केली आहे की या भागात नगरपंचायतचे वतीने काही अंतरावर सुचना फलक लावण्यात यावेत की सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचाला बसल्यास दंड ठोठावला जाईल व उघड्यावर बसणारांचे फोटो काढून ते नगरपंचायत कडे जमा करून त्यांचेवर कारवाई केली जाईल अशा आशयाच्या मजकूर असलेलें फलक लावावेत तसेच या भागातील चीकन सेंटर चे विक्रेत्यांना नोटीस काढून सार्वजनिक ठिकाणी कोंबड्यांची पिसे तसेच टाकाऊ पदार्थ टाकू नयेत दर पंधरा दिवसांनी एकदा या परिसरातील साफसफाई स्वच्छता करून सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे या भागात दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू केली जावीत व नागरिकांची गैरसोय टाळावी अशीही मागणी होत आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा