उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
कर्तव्य मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने २५/४ लवंग येथील फिनिक्स स्कूलमध्ये बालकांचे व पालकांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या निकृष्ट व भेसळ युक्त अन्न पदार्थामुळे मानवी आरोग्य संपुष्टात आले आहे. फास्ट फूड,जंक फूड याकडे बालके आकर्षित होतात व वारंवार आजारी पडतात. या पिढीचे निकृष्ट व भेसळयुक्त अन्नामुळे लहान वयातच अनेक शारीरिक व्याधी चे प्रमाण वाढत आहे.आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे .
आपल्या डिग्री किंवा शिक्षणाचा वापर केवळ धन संपत्ती कमविणे नसून समाजातील गरजू लोकांना मदत करून मानवधर्म पाळणे, आरोग्य विषयक सल्ला देवून निरोगी आयुष्य कसे जगावे.याचे मार्गदर्शन कर्तव्य फाऊंडेशनच्या मार्फत देशभरात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येत आहे.
लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये बालक व पालकांचे कर्तव्य मेडिकल फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी,उपचार व उत्तम आरोग्यासाठी आहार कसा घ्यावा याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.फैज सय्यद, डॉ.ऋषिकेश पाटील डॉ.यश थोरात,डॉ.वैष्णवी माने,डॉ.श्रेया थोरात,आरोग्य सेवक आयान शेख यांनी आरोग्य तपासणी शिबिर उत्तम रित्या पार पाडले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी सर्व वैद्यकीय तज्ञांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा