Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

*चांदापुरी परिसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.*

 


*माळशिरस तालुका -प्रतिनिधी*

  *रशीदभाई शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

क्रांतीसुर्य...विश्वरत्न सविंधानाचे शिल्पकार परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती चांदापुरी परिसरामध्ये जल्लोषपुर्ण वातावरणात साजरी झाली.जातिभेदाच्या वर्णव्यवस्थेला छेद देऊन डाॅ. बाबासाहेबांनी वंचित पिढीत व दबलेल्या समाजमनाला सन्मानाने जगण्याची उभारी देऊन अखिल मानवधर्म सन्मानित केला. चांदापुरी येथील बुध्दविहारामध्ये डाॅ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन व प्रतिमा पुजन करुन जयंती सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी सरपंच जयवंत आण्णा सुळ,युवानेते विजयदादा पाटील, उपसरपंच हणमंत सरतापे,माजी सरपंच भजनदास चोरमले,शाहिद भाई शेख, दादा सरतापे, दिनेश गाडे,अजित लोखंडे,तात्यासाहेब चोरमले,संतोष सरक,शिवाजी गोरवे, मोहन सरतापे,तुकाराम मिसाळ,विजयकाका कवळे,रामचंद्र निकम,विजय निकम, पत्रकार रशीद भाई शेख, राजु खरात, इ.मान्यवर उपस्थित होते.@चांदापुरी चौकात भिमक्रांती तरुण मंडळ यांचेवतिने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजर्षी शाहू, क्रांतीसुर्य फुले यांनाही अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते ऋषिकेश दळवी सर यांनी आपल्या ओघवत्या वाणीतुन डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. व उपस्तितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी सरपंच जयवंत आण्णा सुळ,उपसरपंच हणमंत सरतापे,विजय दादा पाटील, भजनदास चोरमले,डाॅ.कुमार लोंढे, महिबुब पठाण, भगवान सुळ, हंबिरराव जाधव,राजाभाऊ निकम, दत्ता अर्जुन, विलास चोरमले,अक्षय देठे,समाधान साबळे,विजय कवळे,शुभम सरतापे,अरुणतात्या बोडरे,पत्रकार रशीद शेख, राजु खरात,आण्णा भोसले,तसेच भैय्या सातपुते,प्रवीण देठे,समीर साबळे, महादेव सरवदे गुरूजी,रणजित सरतापे,इ.मान्यवर उपस्थित होते.*तसेच सरतापेवस्ती येथे सरतापे परिवार व सर्व भिमबांधव यांच्या उपस्थिती मथ्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करून उपस्थितांना अन्नदान करण्यात आले.यावेळी सरपंच जयवंत आण्णा सुळ,पठाण वस्तीचे सरपंच एजाज पठाण, उपसरपंच हणमंत सरतापे,दिलीप सरतापे,मोहन सरतापे,दादा सरतापे,आपा सरतापे,रणजित गायकवाड, लहु पाटील इ.उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा