*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
बार्शी तालुक्यातील झाडीबोरगाव या गावामध्ये भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली गावातील समाज मंदिरामध्ये तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाडीबोरगाव गावचे सरपंच रमेश सांगुळे उपसरपंच शशिकांत पाटील माजी सरपंच जयपाल मते माजी उपसरपंच कृष्णात मते गावचे पार्टी लीडर अतुल मते यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजनानंतर भिमराव लोखंडे व पांडुरंग लोखंडे यांच्या वतीने लाडू व समोसे वाटप करण्यात आले.त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांवर ठेका धरत येथील सर्व नागरिकांनी भिम जयंतीचा जल्लोष केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमराव लोखंडे पांडुरंग लोखंडे सुनील भालेराव आनंद भालेराव मनोज वाघमारे आकाश सरवदे यांचेसह इतर भिमसैनिकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा