*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आढळून आलेल्या आरोपींमध्ये 13 आरोपी पुजारी असल्याची बातमी प्रसारमाध्यमात काहींनी मुद्दाम प्रसारीत करण्यास भाग पाडले असल्याचे लक्षात येते.
प्रसारमाध्यमांनी प्रकरणाची शहानिशा न करता प्रसिद्धी च्या हव्यासापोटी शहरातील 4 ते 5 हजार पुजाऱ्यां ची बदनामी विनाकारण करायला सुरुवात केली
ड्रग्स प्रकरणात हाताच्या बोटावर मोजण्या इतके टाळके गुंतलेले असताना त्यांना वाचवण्यासाठी ,तपास पासून लक्ष्य विचलित करण्यासाठी काही राजकीय महत्वकांक्षी लोक व प्रशासन जाणून बुजून अशा तोतांड बातम्या प्रसारीत करून बदनामी करत आहेत.
हे प्रकरण च पुजारी मंडळ तुळजापूर व शहरातील सुज्ञ नागरिक यांनी मिळून आवाज उठवून आंदोलनाच्या माध्यमातून दखल घ्यायला भाग पाडले,तेव्हा हे स्वयंघोषित राजकीय आका पकडण्यास प्रशासनास सुरुवात झाली..
या सर्व प्रकरणात ड्रग्स चे *आका* सत्ताधारी पुढारी असून सुद्धा बदनाम मात्र पुजारी लोकांना करण्यात येत आहे, अवैध धंदे करायचे असल्यास राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कसे शक्य आहे हे सर्व जण जाणून आहेत,
गेली 2 ते 3 वर्ष या सर्व प्रकाराला राजकीय पाठबळ मिळत असून,आता मात्र स्वतःच्या अंगलट येत असताना व स्वतःचे जवळचे मांडी ला मांडी लावून बसणारे लोक अडकत असल्याचे लक्ष्यात येताच पुजारी लोकांची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे..
शहरात ड्रग्स हा प्रकार गेली 2 ते 3 वर्षांपासून जाणून बुजून रुजवला गेला असल्याचे वरील सर्व घटनेतून दिसून येते..
ड्रग्स प्रकरण हे सत्ताधारी असणाऱ्या व जिल्ह्याचा मीच मालक म्हणून घेणाऱ्या पुढाऱ्याला खूप आधीपासून हे प्रकार माहिती होते,पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे सर्व प्रकार खपवून घेण्यात आले असे सर्वांना कळून चुकले आहे
ज्या वेळेस हे प्रकरण उघड झाले त्यावेळेस यातील बहुतेक आरोपी हे सत्ताधारी पुढाऱ्या सोबत वावरत असल्याचे दिसून आले,जेव्हा नावे उघड झाली तेव्हा हे फरार होऊन पळून गेली ,या अगोदर हे आरोपी उजळ मात्याने सोबत फिरत असल्याचे दिसून आले मग या आरोपींना फरार होण्यास मदत केली गेली हे लक्ष्यात येते..
आरोपी आता सापडत नाही म्हणल्यावर प्रशासनाचे वाभाडे निघत असल्याचे दिसून येते ..
*म्हणून शहरातील गरीब , निष्पाप पुजाऱ्यांची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे याचा मी एक देवीचा पुजारी म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतो यापुढे जर जाणून बुजून पुजारी लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला जनआंदोलन उभे करून प्रशासनाचा निषेध करावा लागेल असे जाहीर करतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा